आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सावता महाराज

हंडी निमगाव | बाळासाहेब पिसाळ : हंडी निमगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावता महाराजांना आदरांजली अर्पण केली.

सावता महाराज

संत सावता महाराजांनी आपल्या आचरणातून भक्तीबरोबरच श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सावता महाराज

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण जाधव बाळासाहेब जाधव, सचीन जाधव,कुणाल पिसाळ, किरण गरड, राजेंद्र क्षीरसागर,गणेश जाधव,बापूसाहेब जाधव, शिवाजी जाधव, किशोर जाधव, उद्धव जाधव, विकास जाधव, आंनद रोडगे, योगेश जाधव,बाबासाहेब रोडगे, रमेश जाधव, चांगदेव जाधव, सागर जाधव, अशोक जाधव, निलेश जाधव, साहेबराव भणगे निवृत्ती भणगे, यशवंत पिसाळ किशोर भणगे, मुरलीधर जाधव, गणेश भणगे, ऋषिकेश भणगे,हंडी निमगाव भजनी मंडळ, साईनाथ तरुण मंडळ सर्व सदस्य आयोजकांनी परिश्रम घेतले .किरण जाधव यांनी आभार मानले

सावता महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सावता महाराज
सावता महाराज
सावता महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सावता महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!