घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी अन्सार इसाकभाई शेख, तर उपाध्यक्षपदी संदीप प्रकाश सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव सोनवणे यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला.

यावेळी नूतन अध्यक्ष अन्सार इसाकभाई शेख व उपाध्यक्ष संदीप प्रकाश सोनवणे यांचा वसंतराव सोनवणे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले कार्य करावे, तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे, अशा शुभेच्छा वसंतराव सोनवणे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या सत्कार समारंभास ज्येष्ठ नेते नानासाहेब रेपाळे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष जनार्दन सोनवणे, दीपक शेठ जाधव, भास्कर सोनवणे, कचरू सोनवणे, बाबासाहेब शेषराव सोनवणे, सुधाकर शिंदे, शरदराव पा. सोनवणे तसेच पत्रकार दादा पाटील दरंदले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







