धर्मध्वज

देवगड फाटा (वार्ताहर):विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरासंगम टोका (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे ५१ फूट उंच धर्मध्वज स्थापना तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भक्तीमय, उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवर्य  महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे विधिवत पूजन करून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन जल्लोषात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य भास्करगिरी महाराज होते. व्यासपीठावर ह.भ.प. महंत सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम, मुकीदपूर), धर्माचार्य प्रमुख डॉ. जानार्दन महाराज मेटे (विश्व हिंदू परिषद), प्रभाकरजी शिंदे (केंद्रीय विश्वस्त, विहिंप), संजयजी आप्पा बारगजे (क्षेत्रीय प्रमुख, महाराष्ट्र-गोवा), आमदार विठ्ठलराव लंघे, नेवासा नगराध्यक्ष करणसिंग घुले, ॲड. सुनील चावरे (विभाग मंत्री, विहिंप – मराठवाडा), विठ्ठल महाराज नाईक, विजय वाकचौरे, शुभमजी  मुर्तडक, प्रशांत बहिरट तसेच विविध संत-महंत, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

धर्मध्वज

सभेत मार्गदर्शन करताना महंत भास्करगिरी महाराज म्हणाले,सर्वांचे कल्याण व्हावे, कोणीही दुःखी राहू नये हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. जिओ आणि जिणे दो’ हा विचार  रुजला पाहिजे. भारतीय संस्कृती, परंपरा व संस्कार जपणे ही काळाची गरज आहे. हिंदू धर्म माणुसकी जोडणारा आहे; अन्याय करणार नाही आणि अन्याय सहनही करणार नाही.उत्कृष्ट कार्यक्रम नियोजन केल्या बद्दल आयोजकांचे कौतुक केले

यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम या घोषणांनी परिसर दणाणून गेला. भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळ्या व कमानींनी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झाल्याने त्यांना  कार्यक्रम दरम्यान भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामस्थ, युवक, महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

Kavya

या प्रसंगी हभप बहिरट महाराज बाळासाहेब पाटील, माजी सरपंच सुनील बाकलीवाल, दिनकरराव कदम, राजेंद्र देवरे, प्रशांत बहिरट ,महेश शिंदे, बाबासाहेब गोतराणे,अशोकराव ढगे, संतोष पंडुरे, अविनाश काळे,विशाल वाकचौरे ,शुभम मुर्तडक, सुनील परदेशी, गजानन गवारे, गंगाराम रासने, कृष्णा परदेशी, महेश शिंदे, संदीप परदेशी,काकासाहेब खंडागळे, दीपक आगळे, शुभ मुगले, संदीप साबळे, स्वानंद जोशी, घनश्याम जोशी, रसाळ गुरु, राजेंद्र गायकवाड, तिडके वायरमन, अमोल ढोले, शिवाजी जगताप, गणेश काळे तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. जानार्दन मेटे महाराज यांनी केले तर आभार दिनकरराव कदम यांनी मानले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धर्मध्वज
धर्मध्वज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धर्मध्वज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!