नेवासा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन घोडेगाव येथे दोन गटांमध्ये राडा झाला. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, घोडेगाव पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, (दि. ७) रोजी नमन संतोष गायकवाड (रा. देवी रोड, घोडेगाव) हा व त्याचे मित्र पान स्टॉलवर पायी जात असताना आरोपी अनिकेत राजेंद्र घोडेकर, सुनील राजेंद्र घोडेकर, राजेंद्र घोडेकर यांनी तु सार्थक भोसले बरोबर राहु नकोस, असे सांगितले.

त्यावेळी फिर्यादी यांनी मी त्याच्या बरोबर राहील किंवा नाही माझी मर्जी, असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी यास लाथाबुक्यांनी मारहाण करत छऱ्याच्या बंदुकीच्या उलट्या बाजुने मारहाण केली. तसेच तु जर आमच्या नादी लागला तर तुला गोळ्या घालीन, असा दम दिला असल्याचे दाखल फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. तर दुसरी फिर्याद अनिकेत राजेंद्र घोडेकर (वय २५) हे बस स्टॅण्ड वरील पान टपरीवर उभे असताना त्या ठिकाणी आरोपी संजय लक्ष्मण गायकवाड, आण्णा लक्ष्मण गायकवाड, नमन संतोष गायकवाड, सोमा इखे (सर्व रा. घोडेगाव) हे आले व तु आमच्या गाडीची टिप देतो का? कशाची टिप, असे म्हणल्याचा राग आला.त्यावरून आरोपींनी लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी गजाने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिद्र आडकित्ते करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

