बालाजी देडगाव
बालाजी देडगाव

बालाजी देडगाव – बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास धर्म ध्वजारोहणाने उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

बालाजी देडगाव

येथील महादेव मंदिर देवस्थान येथे आयोजित या सोहळ्यात देविदास महाराज म्हस्के (संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा) यांच्या हस्ते, मेजर रवींद्र देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली व सुखदेव महाराज मुंगसे यांच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण पार पडले. यावेळी सपना वेलनेस परिवाराचे डॉ. अर्जुन सुसे, सदाशिव महाराज पुंड, बाबासाहेब महाराज वांढेकर, माजी सभापती कारभारी चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, मार्केट कमिटीचे माजी सभापती कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी चेअरमन कारभारी मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, मच्छिंद्र मुंगसे, कुंडलिक कदम, रघुनाथ कुटे, मधुदेवा तांदळे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सतीश मुथ्था, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील मुथ्था, मधुकर क्षीरसागर, मच्छिंद्र कदम, भाऊसाहेब सावंत, बहिरवनाथ एडके, विवेक औटी, दादासाहेब वाहूरवाघ, जनाभाऊ मुंगसे, भाजपचे आकाश चेडे, बाळूशेठ चोपडा, संदीप तांबे आदी उपस्थित होते.

बालाजी देडगाव

संदीप नांगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, हरिभाऊ देशमुख, अरुण वांढेकर, विठ्ठल क्षीरसागर, समस्त ग्रासस्थ व भजनी मंडळ देडगाव विशेष परिश्रम घेत आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बालाजी देडगाव
बालाजी देडगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बालाजी देडगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!