
घोडेगाव : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल गुरूवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी गड शिवनेरी येथून पायी आणलेल्या ज्योतीचे ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

महिलांनी या तरुणांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी जि. प. प्राथमिक शाळा तसेच शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयाने देखील या कार्यक्रमात सहभागी होत आनंद द्विगुणित केला. लेझीम पथक, छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाऊ आईसाहेब, मावळे यांची वेषभूषा परिधान केलेले विद्यार्थी या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. जि. प.सदस्य सुनील गडाख व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी दत्तात्रय लोहकरे, सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ. अक्षय लोहकरे, गणेशवाडीचे माजी सरपंच कृष्णा तांदळे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी नारायण दहीफळे, डॉ. दत्तात्रय लोहकरे, शिवचिंदबर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे, मराठी शाळेचे उर्मिला जरे, अशोक कर्डीले, श्रीमती साळवे, दिलीप इथापे, देविदास गडाख, पोलीस पाटील संजय दहीफळे, रमेश गडाख, संदीप लोहकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

