
नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल पुरस्कार मिळावा ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे सर्व भाजीपाला संशोधकांना व शास्त्रज्ञाना मानाचा मुजरा, करतो.

भाजीपाला संशोधन करून उत्तम जाती व चांगल्या शिफारशी दिल्या त्याचा सदुपयोग करून शेतकऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून भाजीपाल्याचे उत्पादन भरघोस घेतले तथापि भाजीपाल्याला उत्पादन खर्च भाव नाही हे मात्र दुर्दैव अशी प्रतिक्रिया कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केली.

भाजीपाला संदर्भात १ सामाजिक मानसिकता भाजीपाला फुकट खाण्याची आहे.भाजीपाल्याचे आपल्या देशामध्ये प्रचंड उत्पादन होत असून आपण जगात तिसऱ्या नंबर वर आहोत. भाजीपाल्याचे भाव ठरविण्यासाठी विशेषता शेपू, मेथी कोथिंबीर ,वांगे याचा उत्पादन खर्च कृषी शास्त्रज्ञांनी तयार केल्याचे आढळत नाही शेतकरी संघटने मार्फत भाजीपाल्याला भाव मिळण्यासाठी आंदोलन झालेली वाचण्यात नाही उदाहरणार्थ शेपू ,कोथिंबीर, मेथी ,पालक वांगी इत्यादी राज्याच्या कृषि मूल्य आयोगाने भाजीपाल्याचे भाव ठरविण्यासाठी कुठलीही यंत्रणा उभी केल्याचे निरीक्षण करता आढळत नाहीत.

भाजीपाल्यासाठी कृषी विद्यापीठाचे उत्कृष्ट संशोधन शेतकऱ्याचे कष्ट त्यामुळे प्रचंड उत्पादन मात्र उत्पादन खर्चावर भाव ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही ही तर क्लेशदायक बाब आहे अशी स्पष्ट प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

