लाडक्या बहिणी
लाडक्या बहिण

नेवासा – राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल सकाळपासूनच अनेक लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे महिलांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण आहे.

लाडक्या बहिण

ज्या महिलांना अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी संबंधित बँक शाखा किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. ई-केवायसी करताना चुकीची माहिती दिल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला होता. यामुळे महिलांमध्ये नाराजी होती, याची दखल घेत सरकारकडून लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल सुरू केले असून महिलांना आपल्या अर्जात ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती करता येणार आहे.

लाडक्या बहिण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!