नेवासा--मौजे रामडोह, ता. नेवासा येथील काही नागरिकांनी पोलिस निरीक्षक, नेवासा पोलिस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत गावातील तीन महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीवर तब्बल २५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून सामाजिक कार्यकर्ता सचिन गवांदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले.
नेमका आरोप काय?
तक्रारदार निता संतोष गहीरे (वय ३५) यांनी दिलेल्या अर्जानुसार, मनिषा शाम परसेव्या ऊर्फ मनिषा सागर लकारे ऊर्फ मनिषा शंकर लकारे, मिरा शाम परसेव्या आणि गायत्री मनिषा लकारे या तिघी महिलांकडून गावातील महिलांना आणि तरुणांना खोटे पोक्सो (POCSO) गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे.

तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, दोन लाख रुपयांपर्यंत खंडणीची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि पैसे दिल्यानंतर तडजोडीने प्रकरण मिटवले जाते. यापूर्वी ९ ते १० मुलांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इतर आरोप
संबंधित महिला गावातील दुसऱ्या प्लॉटवर विनापरवानगी राहत असल्याचा दावा
शेजाऱ्यांशी वारंवार वाद आणि दमदाटी
घरातील लहान मुलांवर मानसिक परिणाम
अश्लील शिवीगाळ आणि गैरवर्तन
तसेच संबंधित महिलांची वैद्यकीय तपासणी सिव्हिल हॉस्पिटल, नेवासा फाटा येथे करण्यात यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.

उपोषणाचा इशारा
तक्रारीवर योग्य कारवाई झाली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अर्जदारांनी दिला आहे.
“गावात शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणे ही आमची बांधिलकी आहे.”
– सामाजिक कार्यकर्ता सचिन गवांदे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

