आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवाजी महाराज

नेवासाफाटा (वार्ताहर): शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संकुल, ढोरजळगांव-ने येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण संकुल परिसर भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संकुलाचे मुख्य प्रशासन सचिनराव कर्डिले सर, सीनियर कॉलेजचे प्राचार्य चोळके सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य भोईटे सर, माध्यमिक विभागाचे प्राचार्य आशिष भारती सर, पब्लिक स्कूलचे प्राचार्य बुधवंत सर, मुख्याध्यापिका श्रीमती झिंजुर्डे मॅडम, डी.एड. कॉलेजचे प्राचार्य नवल सर तसेच सीनियर कॉलेज विभाग प्रमुख संदीप घोडेचोर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी शिवव्याख्याने सादर केली. देशमुख श्रुतिका, कळमकर सिद्धी, बानगुडे प्रतिभा, डिके मानवी, कुमारी शिंदे अंजली, गोंदणे गोरक्षनाथ, जगदाळे अर्णव, श्रुती खैरे, दातीर गौरव व किरण रोजनकर यांनी आपल्या वक्तृत्वातून शिवचरित्राचा गौरव केला. त्यांच्या भाषणातून शिवाजी महाराजांचे धैर्य, संघटन कौशल्य, शिस्तप्रियता आणि राष्ट्रनिष्ठा यांचा प्रभावी आढावा घेण्यात आला.

संकुलाचे मुख्य प्रशासन सचिनराव कर्डिले सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये शिवविचार रुजणे ही काळाची गरज आहे. आजच्या पिढीने शिवाजी महाराजांचे आदर्श, कर्तव्यनिष्ठा आणि नेतृत्वगुण आत्मसात करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे.” त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान शिवगर्जना, पोवाडे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणांनी दुमदुमून गेला. या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आकाश मिसाळ सर यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!