नेवासा- –माहेरहून पैसे घेऊन ये, नाहीतर येथे राहायचे नाही, अशी धमकी देत एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहिल्यानगर शहरातील लालटाकी, भारस्कर कॉलनी येथे राहत असलेल्या ३२ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पीडित विवाहितेने मंगळवारी (२४ फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे. पती बाळासाहेब अण्णासाहेब कनगरे, सासरे अण्णासाहेब भाऊराव कनगरे, सासू सुनीता अण्णासाहेब कनगरे, सवत सोनाली बाळासाहेब कनगरे (सर्व रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा), नणंद आशा काकासाहेब वडागळे, काकासाहेब प्रभाकर वडागळे
(दोघे रा. कांगोणी फाटा, ता. नेवासा) आणि नातेवाईक योसेफ नाना चव्हाण (रा. शहरटाकळी, ता. शेवगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सासरी नांदत असताना संशयित आरोपींनी संगनमत करून तिला वारंवार अपमानास्पद वागणूक दिली.शेतीसाठी आणि हुंड्याचे उर्वरित पैसे आणण्यासाठी संशयितांनी पीडितेकडे तगादा लावला होता. माहेरून पैसे घेऊन येण्याची मागणी करत मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून छळ केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भरोसा सेलकडे प्राप्त झालेल्या अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल झाला असून, तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

