
नेवासा – आज एकादशी व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्ञानेश्वर मंदिर येथे भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पवित्र पैस खांबाची महाआरती संपन्न झाली. ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय रावसाहेब चौधरी सर व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या शुभहस्ते ही महाआरती करण्यात आली.

या प्रसंगी देवस्थान समितीचे सर्व सदस्य तसेच मोठ्या संख्येने माऊली भक्त उपस्थित होते. एकादशीचे औचित्य साधून मंदिर समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यापुढे प्रत्येक एकादशीप्रमाणेच दररोज पहाटे ५ वाजता महाअभिषेक व सायंकाळी ६ वाजता महाआरती नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले. इच्छुक भक्तांनी या धार्मिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी मंदिराशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास ज्ञानेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग अभंग साहेब, मठाधिपती वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, विश्वास मामा गडाख, भिका भाऊ जंगले, राम मामा जगताप, कैलासराव जाधव, प्रमोद शिंदे, डॉ. भाऊसाहेब घुले, अॅड. संजय शिंदे, ढवळे सर, शिवाजी आप्पा होन, विष्णू भाऊ जाधव व इतर भक्तमंडळी उपस्थित होते.
कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

