नेवासा – शब्दांकन-डॉ अशोक ढगे- आम्ही नेवासकर न्यूज अपडेट या चॅनेल मार्फत दिली जाणारी माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. माहितीमध्ये शेती, शैक्षणिक, गुन्हेगारी, अपघात, सामाजिक राजकीय साहित्यिक यासंदर्भातील सर्व बातम्या नेवासा तालुक्यातील कानाकोपऱ्यातून संकलन करून प्रसिद्ध केल्या जातात हा एक नेवासा तालुक्यातील आरसा आहे. सर्व नेवासा तालुक्यातील सविस्तर प्रतिबिंब आढळून येते. या माहिती मधून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काय चालू आहे व पुढे काय करता येईल याची सुद्धा चांगली माहिती मिळते. नेवासा तालुक्यामध्ये संस्कृती जपण्याचे थोर कार्य संत महंत धार्मिक माध्यमातून करत आहेत त्यामुळे सामाजिक प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे समाजामध्ये सकारात्मक व विधायक विचारसरणीची पेरणी संत महंत करत आहेत व त्याच्या सविस्तर बातम्या आम्ही नेवास कर मधून प्रसिद्ध होत असल्यामुळे सामाजिक जडणघडण सुदृढ होत आहे.
तालुक्याच्या विकासामध्ये सहकारी साखर कारखानदारी मोठी भर घालत आहे तथापि त्यांचे दोष मापात पाप व रिकव्हरीची चोरी या गोष्टी समर्थपणे व निपक्षपातीप्रमाणे मांडल्या जात आहेत. शैक्षणिक प्रगती होण्यासाठी अधिक वाव असून आजच्या प्राप्त स्थितीबद्दल शैक्षणिक प्रगतीची वाटचाल सविस्तरपणे बातम्यातून येत आहे विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता या संदर्भातील कार्यशाळा लक्ष विधी आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा अंतर्गत कथा व काव्य कार्यशाळा तसेच फिरते मोफत वाचनालय विविध उपक्रम तालुक्यातील उल्लेखनीय बाब आहे. आम्ही नेवासकर न्यूज अपडेट मध्ये गुन्हेगारी क्षेत्रा संदर्भीय बातम्या प्रकाशित झाल्यामुळे पोलीस दलाचे कार्य समाजापुढे प्रशंसनीय ठरत आहे. नेवासा तालुक्यातील सर्व पत्रकार डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस बातम्यांचा महापूर तयार करत आहेत निश्चितच त्यामुळे पुरोगामी विचार व विज्ञाननिष्ठा वाढीस लागत आहे. जात धर्म भेदाभेद अमंगळ हा संदेश सर्व महाराष्ट्राला सौंदाळा गाव देत असून त्याला यथोचित प्रसिद्धी मिळाली आहे.
शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी कृषी खाते व कृषी शास्त्रज्ञ करत असलेले प्रयत्न अभिनंदन आहेत. शेतीसाठी पाणी महत्त्वाचा प्रश्न असून यासाठी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते जागृत राहून पाण्याची उपलब्धता धरणातून होण्यासाठी कृतिशील आहेत. शेतमालाचे उत्पादन वाढत असली तरी त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आंदोलने अधून मधून करीत आहेत. नेवासा तालुक्याला वैचारिक व तात्विक चांगली पार्श्वभूमी लाभली आहे या तालुक्यामध्ये संत महंत विचारवंत कृतिशील राज्यकर्ते विकासासाठी झटणारे नेते यामुळे तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे यापुढेही सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विकासाची घोडदौड सुरू राहण्यासाठी रोजगार निर्मिती, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव यासाठी प्रक्रिया उद्योग, धार्मिक अधिष्ठान असलेल्या विचारांचा प्रभाव व त्यामुळे नैतिकता वाढीस लागणे यासाठी विचार मंथन काळाची गरज आहे अशी प्रतिपादन डॉ अशोकराव ढगे यांनी केले आहे तसेच त्यांनी आम्ही नेवासकर, माय महाराष्ट्र नेवासा दर्शन व सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देऊन विधायक कार्यास अधिकाधिक सहयोग वाढवावा असे आवाहन केले आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







