
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मांगिरबाबा यात्रा उत्सवाला सोमवार, दि. २ पासून प्रारंभ होत आहे. गावात सध्या भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम पाहायला मिळत असून यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहेत.

सोमवार, दि. २ रोजी रंगतदार नृत्य स्पर्धेने उत्सवाची सुरुवात होणार आहे. तर मंगळवार, दि. ३ रोजी आकर्षक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी प्रथम क्रमांक रु. ३१००, द्वितीय क्रमांक रु. २१०० आणि तृतीय क्रमांक रु. ११०० अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

मंगळवार, दि. ३ रोजी पहाटे ५ वाजता भव्य कावड मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. सकाळी साडेनऊ वाजता मांगिरबाबा नैवेद्य व श्री घोडेश्वरी देवीस चोळी-पातळाचा पारंपरिक विधी पार पडेल. रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्रातील नामांकित बँडपथकांचा जुगलबंदी कार्यक्रम रंगणार असून त्यामध्ये जय सद्गुरू ब्रास बँड, श्री सद्गुरू ब्रास बँड, उस्मान शहा ब्रास बँड आणि नाद हलगी यांचा सहभाग असणार आहे.

बुधवार, दि. ४ रोजी महाराष्ट्रातील अग्रेसर कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम सादर होणार असून याच दिवशी नृत्य व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सोहळा देखील पार पडणार आहे.
यात्रेनिमित्त गावात मोठी गर्दी अपेक्षित असून भाविकांनी व नागरिकांनी उत्सवात सहभागी होऊन परंपरा आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

