पाचेगाव फाटा (वार्ताहर) नाशिक येथून उत्तर भारतात तीर्थाटन करीता जात असलेल्या भरधाव वेगातील आरामबस दि १४ मार्च वार शनिवार रोजी पहाटे उज्जैन-कानपूर महामार्गावर इस्पादनगर पुलावर उभ्या असलेल्या डंपरवर आदळून चाळीस यात्रेकरू जखमी तर निंभारी (ता.नेवासे) येथील भागीरथी शिवाजी जाधव(वय-६५) ठार झाल्या आहेत.
जखमींमध्ये ठार झालेल्या जाधव यांच्या तीन मुली व दोन जावई जखमी झाले आहेत. रविवारी त्यांचा अंत्यविधी तिर्थक्षेत्र वाराणसी ( काशी) येथे शोककळा वातावरण करण्यात आला.

नाशिकसह ओझर,पिंपळगाव व मालेगाव येथील ५५ भाविक कुंभारी (ता.निफाड) येथील अथर्व ट्रॅव्हल्सने नवीन घेतलेल्या आरामबसमध्ये गुरुवार (ता.१२) रोजी उत्तर भारत यात्रेकरिता गेले होते. कानपूर येथील पणती औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघात होताच जवळचे काही ग्रामस्थ जमा झाले मात्र बसचा पुढील भाग व दरवाजा चक्काचूर झाल्याने आतमध्ये प्रवेश करणे जिकरीचे झाले होते.
काही मिनिटात नाशिक जिल्ह्यात खबर मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निफाडचे आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम यांनी कानपूर प्रशासन व कांदा व्यापा-यांशी संपर्क केला आणि एक तासात सर्व जखमी व किरकोळ जखमी झालेल्या यात्रेकरूंना बसच्या बाहेर काढण्यात आले.

या अपघातात निंभारीच्या जाधव यांच्यासह बसचा चालक व मालक असे तीन जण ठार झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जाधव यांच्या मुली सारिका गरुड, पुष्पा पांडुरंग शिंदे, ताराबाई होन तसेच जावई रामभाऊ गरुड व बाबासाहेब होन हे देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमी लाला लजपतराय चिकित्सालय, शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेनंतर मुळाथडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्यसंस्कार तीर्थक्षेत्र ठिकाणी करण्यात आला
अपघातात ठार झालेल्या भागीरथी जाधव यांचा अंत्यविधी वाराणसी (काशी) येथे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे पती शिवाजी जाधव, मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झालेली दोन्ही मुले सोमीनाथ व ज्ञानेश्वर तसेच नातेवाईक विमानाने जाऊन त्याचा अंत्यविधी करण्यात आला.या दुर्दैवी घटनेत भागीरथी बाई यांच्या निधनाने निंभारी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

