आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गेडाम
उपोषण

सोनई – श्री शनैश्वर देवस्थान शनिशिंगणापूर येथील नवीन कायम कर्मचाऱ्यांचा संयम अखेर संपला. सात महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या मागण्यांकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

उपोषण

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ते गेली अनेक वर्षे देवस्थानात प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, मागील सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले असून, मुलांच्या शिक्षणापासून वैद्यकीय खर्चापर्यंत सर्वच बाबींमध्ये गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा निवेदने सादर केली होती.

उपोषण

परंतु कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी तीव्र होत गेली. अखेर ३० मार्चपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.

उपोषण

या आंदोलनामुळे देवस्थान प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या या ठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वेतनासाठी उपोषण करावे लागत असल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. भाविकांमध्येही या नाराजी व्यक्त होत आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!