आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
CCTV

नेवासा फाटा :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या सन १९९५-९६ ची इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीया, व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबवत २५६ पटसंख्या असलेल्या शाळेला मैत्रीच्या माध्यमातून ५१००० हजार रुपये पर्यंतची भरघोस मदत करत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण केले आहे.

CCTV


सदर शाळा परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी व नावाजलेली शाळा असून शाळेत बहुतेक सर्व भौतिक सुविधा असून शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने शाळेतील प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनात चांगल्या प्रकारे झाला, आयुष्य चांगले झाले या भावनेतून सामाजिक भान ठेवत जुन्या मित्रांनी एकत्र येऊन एक समाज उपयोगी आदर्श उपक्रम राबवून शाळेला गुरुदक्षिणा दिली

CCTV


मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री डॉ. संतोष ढवाण व सर्व शाळा व्यसवस्थापन समिती, तसेच पत्रकार सतीश उदावंत, निलेशकुमार मुथ्था, शरद भणगे, डॉ. रवींद्र वडणे, युवा उद्योजक प्रितम साळुंके, संदीप काळे, सचिन भणगे, मंगेश अंबिलवादे, शुभम वाघ, केशव वानरे, अमोल अंबिलवादे आदींनी या कामी पुढाकार घेऊन ५१००० हजार रुपये वर्गणी जमा करत जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी या उपक्रमास हातभार लावला. येथून पुढेही शाळेला संगणक लॅब तयार करण्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे सर्व माजी विदयार्थ्यांनी ठरवले व अशाच प्रकारचे कार्य लोकसहभागातून करून शाळेची उत्तरोत्तर प्रगती होईल असा आशावाद निलेशकुमार मुथ्था यांनी व्यक्त केला.
या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप व शाळेतील शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आभार मानले.

CCTV
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

CCTV
CCTV
CCTV

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

CCTV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!