आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सेन्सेक्स

Indian Stock Market Today 13 April 2026: भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीचा ट्रेंड बदलायचं नवा घेत नाही. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी घसरणीसह ओपनिंग केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, ऊर्जा, तेल आणि वायू, आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राचे निर्देशांक सुमारे 2% घसरले.

Indian Stock Market Today 13 April 2026: अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबाद येथे पार पडलेली चर्चा अयशस्वी झाल्यामुळे 13 एप्रिल रोजी देशांतर्गत बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. सोमवारी, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला, तर प्री-ओपनिंगला 4,200 हून अधिक अंकांनी खाली आलेला.

सेन्सेक्स

शेअर बाजारावर अमेरिका-इराण परिणाम

पश्चिम आशियातील चर्चा अयशस्वी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीचा धोका आणि त्यानंतर तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरवर गेल्याने सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली, सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी जवळपास 2% घसरले.

त्याचवेळी, जागतिक बाजारही कोसळले ज्यामुळे देशांतर्गत बाजारात घसरणीचे संकेत मिळाले. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरून 75,939 वर पोहोचला, तर निफ्टी 450 हून अधिक अंकांनी घसरून 23,600 च्या पातळीखाली आला.

सेन्सेक्स

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध सर्वच 30 स्टॉक्स लालेलाल रंगले. इंडिगो, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्ह यांना सर्वाधिक फटका बसला. तसेच सर्व क्षेत्रीय निर्देशांकातही घसरण नोंदवली गेली. निफ्टी पीएसयू आणि रिअल्टी तीन टक्क्यांहून अधिक घसरले. निफ्टी ऑटो, बँक, वित्तीय सेवा, मीडिया, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि तेल व वायू दोन टक्क्यांहून खाली आले.

दुसरीकडे, एनएसई निफ्टीमध्ये कोल इंडिया, ONGC आणि सन फार्मासारख्या शेअर्समध्ये वाढ झाली तरी, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, ऊर्जा, तेल व वायू, आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राचे निर्देशांक सुमारे 2% घसरले. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे 1.5% खाली आले.

सेन्सेक्स
सेन्सेक्स

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सेन्सेक्स
सेन्सेक्स
सेन्सेक्स

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सेन्सेक्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!