नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतून 26/2/2026रोजी एक महाविद्यालयीन 21वर्षीय युवती महाविद्यालयात जाते म्हणून घरून गेली तेव्हा पासून ती घरी परतलीच नाही त्यामुळे तिच्या पालकांनी, दिनांक 26/02/2026 रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल , केली सुमारे दिड महिना उलटून देखील तिचा शोध लागला नाही त्यानुषंगाने दि. 11/04/2026 रोजी नगरसेवक आकाश बेग व सामाजिक कार्यकर्ते यांनी तिच्या कुटूंबियासह पोलीस निरिक्षक साहेब यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी 2दिवसात शोध लावू असे आश्वासन दिले.

परंतु 2दिवस उलटूनही कुठलाही शोध लागला नाही, एकीकडे राज्य व केंद्र सरकार महिला व मुलींच्या संरक्षण कामी प्रचंड संवेदनशील आहे, तरी अशा घटना घडत असतील तर निंदनीय प्रकार आहे तरी पोलीस तपासाचा हलगर्जीपणाचा निषेध म्हणून आणि न्याय मागण्यासाठी सदर परिवारासहित, सकल हिंदू समाज, व राष्ट्रीय श्रीराम संघ दिनांक 15/04/2026 रोजी लोकशाही मार्गाने राजमुद्रा चौक नेवासा फाटा (अहिल्यानगर -छ.संभाजीनगर हायवे )येथे रस्ता रोको करणर येणार असून जो पर्यंत युवतीचा तपास लागत नाही व तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही होत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू राहील असे निवेदनात म्हटले आहे, तरी सदर आंदोलनास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश बेग यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







