आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अहिल्यादेवी होळकर

नेवासाफाटा –भौगोलिक दृष्टया मोठा असलेल्या नेवासा तालुक्यातील प्रत्येक घटकाला पाण्याची नितांत गरज आहे. तालुक्याला मुळा, भंडारदरा आणि जायकवाड़ी या तीन धरणांचे पाणी मिळत असले तरी भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकाने जलस्रोतांचे बळकटीकरण व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचा सल्ला आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिला.

अहिल्यादेवी होळकर

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित दि.१५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती
पंधरवडयाचा प्रारंभ लंघे पाटील यांचे हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.जलसाक्षरता केंद्र यशदाचे जिल्हा समन्वयक जलमित्र सुखदेव फुलारी, गटविकास अधिकारी संजय लखवाल, अशोकराव टेकणे, बाळासाहेब क्षिरसागर, जगदंबा पाणी वापर संस्थेचे सचिव शशिकुमार भोरे, उपविभागीय अभियंता अभिषेक पवार, उपविभागीय अभियंता स्वप्निल देशमुख, प्रदीप खर्से, बिरबल दरवडे,प्रविन नागपुरे , बांगर रावसाहेब,कपिले रावसाहेब,सचिन हिंगे.किशोर सांगळे,योगेश राशिनकर,बाबासाहेब वारुळे,सागर जाधव, सागर मांडे, विकास चव्हाण, विक्रम मते,निलेश देडराय, रवींद्र यादव, तुकाराम डवले, निवृत्ती हजारे, सोपान घोलप, गणेश पडोळे दिंगबरकुटे.आदी यावेळी उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर

पालकमंत्री राधेकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुका जलस्वंयपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ही आ. लंघे यावेळी म्हणाले. जलमित्र सुखदेव फुलारी यांनी सविस्तर कृती आराखडा यावेळी विशद केला.

मुळा पाटबंधारे विभागाचे जितेंद्र कावले, श्रीकांत करंजे, नितीन लांडे, संतोष राऊत, यादव मनीषा, मीनाक्षी आहिरे, वैशाली पल्हारे, कोमल शिदे, श्रीमती फुंदे, रश्मी देशमुख, उज्वला वेदपाठक, नवनाथ शिरसाठ यांच्यासह पाणी वापरा संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

रजपूत यांनी उपस्थितांना जल प्रतिज्ञा दिली. चिलेखनवाडी उपविभागीय अभियंता स्वप्निल देशमुख यांनी प्रस्ताविक केले. गणेश ढाकणे व रावण ससाणे यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय अभियंता अभिषेक पवार यांनी आभार मानले.

अहिल्यादेवी होळकर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवी होळकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अहिल्यादेवी होळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!