
घोडेगाव नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे घरासमोरील रस्ता नांगरलेच्या कारणातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी स्वाती शरद तोडमल (वय.३२) रा. तोडमल वस्ती लोहगाव या दि. ६ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर जनावरांना चारा टाकत होत्या. यातील आरोपी राहुल नंदकुमार तोडमल हा घरासमोरील रस्ता नांगरत असताना त्यास रस्त्याचा वाद अजून कोर्टात सुरू आहे. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत रस्ता नांगरु नको. असे म्हणल्याचा राग आल्याने फिर्यादीस काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्या वेळी नातेवाईक भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील लाथाबुक्यांनी मारहाण दमदाटी व शिवीगाळ केली. तुम्ही जर आम्हाला या रस्त्याबाबत आम्हाला काही म्हणाले तर तुम्हाला एक एकाला ट्रॅक्टर खाली घालून जिवे ठार मारून टाकील अशी धमकी दिली असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार आरोपी राहुल नंदकुमार तोडमल, गणेश नंदकुमार तोडमल, रंजना नंदकुमार तोडमल, गिता गणेश तोडमल, नंदकुमार सुर्यभान तोडमल, सोनाली राहुल तोडमल, सर्व राहणार तोडमल वस्ती लोहगाव यांच्या विरोधात गुन्हा र. नं. २६०/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), १८९(२), १९१(२), १९१(३) , १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







