
नेवासा – आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

हे प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर व राहिज सर व सर्व विद्यार्थी यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्याप्रसंगी डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिव आदिनाथ पटारे , ज्येष्ठ कडुबाळ पटारे युवा कार्यकर्ते विठ्ठल पटारे,अजित पटारे,संतोष दाणे,महेश आढगळे,सागर दाणे,अनिल गाडे, दत्ताआढगळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







