नेवासा : महाराष्ट्र शासनाच्या State Common Entrance Test Cell, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या MHT-CET (PCM Group) २०२६ परीक्षेचा निकाल १५ जून २०२६ रोजी जाहीर झाला. या निकालात नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथील जयदीप अनिल शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात उत्तम यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

विशेष म्हणजे जयदीपचे ८ वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण सुरेगाव(गंगा) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात झाले आहे. वडील अनिल साहेबराव शिंदे व आई अंजुषा शिंदे यांच्या संस्कारातून आणि गावच्या शाळेच्या पायाभरणीवर त्याने हे यश मिळवले आहे.
त्याच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण सुरेगाव परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण आहे. गावकरी, शिक्षक व विद्यार्थी मित्रांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







