आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मुळा साखर कारखाना
मुळा साखर कारखाना

सोनई – मुळा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार श्रीमती मीराबाई भाऊसाहेब दिवटे (भानसहिवरे) यांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.

मुळा साखर कारखाना


श्रीमती दिवटे यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपूर्वी आवश्यक नोटीस देणे शक्य न झाल्याने त्यांची उमेदवारी तांत्रिकदृष्ट्या कायम राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

मुळा साखर कारखाना


मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या हितासाठी केलेला विकासाभिमुख व सकारात्मक कारभार लक्षात घेऊन आपण सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. विशेषतः महिला राखीव मतदारसंघातील सहकार पॅनलच्या उमेदवार सौ. कमल चांगदेव दहिफळे व सौ. विमल नारायण सोनवणे यांना तसेच पॅनलमधील इतर सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी सभासदांना केले आहे.

मुळा साखर कारखाना


दि. २६ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात मतदारांनी स्वतःला मतदान न करता सहकार पॅनलच्या उमेदवारांना बॅट चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करावे आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याची प्रगती आणि सभासदांचे हित जपण्यासाठी सहकार पॅनलला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे मत श्रीमती मीराबाई दिवटे यांनी व्यक्त केले.

मुळा साखर कारखाना


याप्रसंगी वसंतराव सोनवणे, राम सोनवणे, आबासाहेब सोनवणे,संदीप पटारे,शरदराव सोनवणे,वैभव दिवटे,महेश भणगे आदी उपस्थित होते.

मुळा साखर कारखाना

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मुळा साखर कारखाना
मुळा साखर कारखाना
मुळा साखर कारखाना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मुळा साखर कारखाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!