आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मोनिकाताई राजळे

पाथर्डी : करंजी घाटात दोन वाहनांचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी तत्परतेने धाव घेत मानवतेचे दर्शन घडविले. मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पूर्ण करून मतदारसंघाकडे परतत असताना हा अपघात त्यांच्या नजरेस पडला. अपघाताचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबविला आणि जखमींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

मोनिकाताई राजळे


अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याचे लक्षात येताच आमदार राजळे यांनी कोणताही वेळ न दवडता जखमींना स्वतःच्या वाहनातून पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. त्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

मोनिकाताई राजळे

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची आमदार राजळे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.
संकटाच्या क्षणी लोकप्रतिनिधी म्हणून संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतकार्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाल्याने अनेकांच्या जीवाला दिलासा मिळाला असून, त्यांच्या या कृतीची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

मोनिकाताई राजळे
मोनिकाताई राजळे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोनिकाताई राजळे
मोनिकाताई राजळे
मोनिकाताई राजळे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोनिकाताई राजळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!