आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बस

“स्वर्गीय वकिलअण्णा लंघे पाटील यांच्या आमदारकीच्या काळापासून लंघे कुटुंबीयांशी लालपरीची नाळ जोडली गेली आहे” – आ. विठ्ठलराव लंघे पाटील

नेवासा – गेल्या तब्बल वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बससेवेची ग्रामस्थांची प्रतीक्षा अखेर संपली.
नेवासा–वडाळा–कारेगाव–रांजणगाव–भेंडा या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे सुरू झाली. रांजणगाव व कारेगाव येथे आमदार लंघे पाटील यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या ऐतिहासिक क्षणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

बस

गेली दोन दशके या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांना यश आल्याने परिसरातील हजारो नागरिकांचा दैनंदिन प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे.

यावेळी बोलताना आमदार लंघे पाटील म्हणाले, “या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयासाठी होणारी पायपीट व वेळेची नासाडी थांबणार आहे. शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळेल.”

बस

यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या राज्य परिवहनाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यालाही उजाळा दिला. ते म्हणाले, “लालपरी ही आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. लहानपणापासून शालेय जीवनापर्यंत या लालपरीशी आपली नाळ जोडलेली आहे. स्वर्गीय वकिलअण्णा लंघे पाटील आमदार असताना जनतेची कामे करण्यासाठी मुंबईला जाण्या-येण्यासाठी एसटीचाच आधार घेत असत. शिरसगाव ते मुंबई असा प्रवास करून त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात असंख्य लोकाभिमुख कामे केली. त्यामुळे लंघे कुटुंबीयांचे आणि लालपरीचे नाते अनेक दशकांपासून अतूट आहे. आज या भागात नव्या बससेवेचा शुभारंभ करताना मला विशेष समाधान वाटत आहे.”

बस

या प्रसंगी नेवासा डेपोचे वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर मुरदारे, सिद्धांत नवले, ह.भ.प. रामभाऊ महाराज पेहेरे, जालिंदर वाकचौरे, दत्तात्रेय वाकचौरे, पोलीस पाटील बबनराव शिंदे, रमेशनाना गणगे, अशोक लंघे, बाबासाहेब गोल्हार, विश्वास काळे, सरपंच सतीश काळे, सरपंच गोरख सातदिवे, अंबादास उंदरे, सरपंच सोपान लोखंडे, पत्रकार अशोक पंडित यांच्यासह रांजणगाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला, लाडक्या बहिणी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीस वर्षांनंतर सुरू झालेल्या या बससेवेने केवळ वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली नसून, ग्रामीण भागातील विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

बस
बस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बस
बस
बस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!