नेवासा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत फुले कृषी वाहिनी 90.8 सुरू करण्यात आली आहे या आकाश वाहिनी मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जाते त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी वाहिनीला पसंती दिल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ एक नामांकित व महत्त्वाची संस्था आहे

शेतकऱ्यांची सेवा उद्दिष्ट ठेवून फुले कृषी वाहिनीची प्रगती चांगली सुरू आहे राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत दहा जिल्ह्यात अनेक पिकावर संशोधन सुरू आहे राहुरीत व संशोधन केंद्रावर होणारे संशोधन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात वाढ होत आहे. अनेक पिकांच्या नवीन जाती व तंत्रज्ञानाच्या शिफारशीबाबत वाहिनी मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते त्याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहे कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद चव ई यांच्या समावेत वार्तालाप झाल्यानंतर डॉक्टर ढगे म्हणाले की कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, पशु विज्ञान , अभियांत्रिकी व कृषी शास्त्रज्ञ यांच्या संशोधनाची प्रसारण मोठ्या प्रमाणात केले जाते. कृषी पदवीधर भारतभर मोठ्या प्रमाणात यश मिळवत आहे

त्यांच्या वाटचालीसंदर्भात मार्गदर्शनपर मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात भारतीय पातळीवरचे कृषी शास्त्रज्ञ यांचीहे मनोगत फुले कृषी वाहिनी वर प्रसारित करण्यात येते डॉक्टर ढगे यांनी आवाहन केले आहे की जास्तीत जास्त युवक शेतकऱ्यांनी फुले कृषी वाहिनी 90.8 यावर प्रसारित होणाऱ्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







