आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अवैध धंद्यां

नेवासा, नगर तालुका, राहाता व लोणी येथे जुगार आणि अवैध दारू अड्ड्यांवर छापे; ५ गुन्हे दाखल, ३३ आरोपींवर कारवाई ₹६,५९,००५ किमतीचा मुद्देमाल जप्त;

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार मोठी मोहीम

अवैध धंद्यां

आपला जिल्हा-अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नेवासा, नगर तालुका, राहाता आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार व अवैध दारू व्यवसायांवर एकाच दिवशी धडक छापे टाकले. या कारवाईत ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३३ आरोपींवर कारवाई करत एकूण ₹६,५९,००५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. गुप्त माहितीच्या आधारे दिनांक ५ जुलै २०२६ रोजी विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

अवैध धंद्यां


कारवाईचा तपशील
नेवासा: जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांवर कारवाई; ₹६९,४३० किमतीचे जुगार साहित्य जप्त. तसेच एका आरोपीकडून ₹२,४८० किमतीची देशी दारू जप्त.
नगर तालुका: दोन स्वतंत्र कारवायांमध्ये विदेशी दारू जप्त करत दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल.
राहाता: जुगार अड्ड्यावर धाड टाकून १३ जणांवर कारवाई; ₹४,३६,३१० किमतीचा मुद्देमाल जप्त.
लोणी: जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ आरोपींना ताब्यात घेत ₹१,३७,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त.

अवैध धंद्यां


या सर्व कारवायांमध्ये जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम तसेच देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही समन्वित कारवाई यशस्वीपणे पार पाडली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील अशा कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अवैध धंद्यां
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अवैध धंद्यां
अवैध धंद्यां
अवैध धंद्यां

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अवैध धंद्यां

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!