आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अंधश्रद्धा निर्मूलन समिती

नेवासा-विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा बैठक व मेळावा दिनांक ५/७/२०२६ रोजी अशोकराव ढगे साहेब माजी कुलगुरू (प्रवरा संगम)यांचें अध्यक्षतेखाली तसेच काॅ. बाबा आरगडे यांचें मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
विनायक सापा सर यांनी सर्वांचे स्वागत केले. बुध्द कबीर भिमराव फुले, या धरतीवर जन्मले ! त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखये बाई!! या चळवळीच्या गीताने शशिकांत गायकवाड यांनी कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली

अंधश्रद्धा निर्मूलन समिती


मागिल सभेचा वृत्तांत कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी मांडला . त्याचबरोबर शाखा निहाय साप्ताहिक बैठका घेणेबाबत तसेच इतरही कार्यक्रम व उपक्रम राबवून त्याचा अहवाल जिल्हा शाखेकडे सादर करण्याबाबतची विनंती त्यांनी केली.
५,६,७ जून रोजी अहिल्या नगर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी संबंधित आढावा घेण्यासाठी प्रत्येकाला आपपले चांगले/वाईट अनुभव मांडण्याबाबत सांगितले. त्यामध्ये आप्पासाहेब वाबळे, भाऊसाहेब सावंत, कारभारी गायकवाड, चिमाजी धनवडे, काॅ भारत आरगडे, शब्बीरभाई पठाण, सय्यद एम. बी., चौधरी एम बी , शशिकांत गायकवाड, मल्हारी खेडकर, अशोकराव ढगे, बी के चव्हाण, विनायक ताकपेरे, सौ. नीता भागवत, भारतभूषण भागवत, अनिता सापा,जान्वी मामड्याल, विनायक सापा, विष्णू गायकवाड आणि काॅ. बाबा आरगडे यांनी परखडपणे स्वतः ची मते मांडली.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती


काहींनी पूर्ण वेळ देऊ शकलो नाही म्हणून दिलगिरी व्यक्त केली. तर… बहुतेकांनी खंत व्यक्त केली की, प्रमुख व्याख्यात्यांचे भाषणावेळी पुरस्कारासाठी जादा वेळ गेल्यामुळे समविचारी संघटनेचे कार्यकर्ते जेवणं न करता निघून गेल्यामुळे वाईट वाटले. याबरोबरच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पुर्ण वेळ न दिल्याबाबतची ही खंत व्यक्त करण्यात आली. बाकी ३ दिवसांची राज्य कार्यकारिणी उत्तम झाल्याबाबत आनंद व्यक्त केला.

अहिल्या नगर येथील राज्य कार्यकारिणी साठी जमा झालेला निधी तसेच मध्यवर्ती कडून मिळालेली रक्कम यामधून झालेला खर्च वजा जाता जिल्हा शाखेकडे २८ हजार रूपये शिल्लक राहिल्याचा हिशोब जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा सर यांनी दिला. सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती

दोन दिवसाचे चिंतन शिबीर घेणेबाबत चर्चा होऊन दिनांक २२:व २३ आॅगस्ट हे दोन दिवस निश्चित केले असून,ठिकाणाबाबत स्नेहालय – अहिल्यानगर,
त्रिमूर्ती – नेवासा, आणि हिवरे बाजार, पारनेर (पोपटराव पवार)या तीन स्थळांपैकी एक स्थळ लवकरच फायनल करण्यात येईल. ही जबाबदारी उपाध्यक्ष प्रमोद भारूळे आणि काॅ.बाबा आरगडे यांनी स्विकारलेली आहे.
याशिवाय या पुढील काळात चमत्कार सादरीकरण कार्यशाळा,
शिबीर,शिक्षक प्रशिक्षण , स्वयं अध्ययन परिक्षा तसेच नवीन शाखा भेटी व विस्तार करण्यासाठीचे प्रयत्न यांवर चर्चा करण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती


जून महिन्याचे अंनिस पत्रिका वाटप करण्यात आले.
अनिता सापा व जान्वी मामड्याल यांनी केलेल्या नाष्टाचा आस्वाद घेऊन, हम होंगे कामयाब या गिताने बैठकीची २ वाजता सांगता झाली.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
अंधश्रद्धा निर्मूलन समिती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!