मा मंत्री शंकरराव गडाखांकडून सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना पदाधिकारी निवडीत संधी.
सोनई प्रतिनिधी – मुळा कारखान्याच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवड मंगळ दि 7 जुलै 2026 रोजी जाहीर
करण्यात आल्या
प्राधिकृत अधिकारी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी चेअरमनपदी भाऊसाहेब निवृत्ती मोटे तर व्हा चेअरमनपदी
बाळासाहेब दादा पाटील यांच्या निवडी जाहीर केल्या.

माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी संचालक मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी मुळाचे मा चेअरमन नानासाहेब तुवर ,मा व्हा चेअरमन कडूबाळ कर्डीले,नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब मोटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलतांना मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले
कारखाना सभासदांनी
मोठा विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे
नूतन संचालक मंडळाने सभासद ,शेतकरी यांना केंद्रस्थानी मानून काम करावे
कारखाना ही परिसरासह तालुक्याची कामधेनु आहे.

सभासदांनी मुळा कारखान्याला ऊस द्यावा असे आवाहन त्यांनी केले
व सदैव सभासद ,शेतकरी यांच्याशी कटिबद्ध राहून काम करू
असे मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले
स्वतः लक्ष घालून
कारखाना गळीत हंगामाचे नियोजन
करणार असल्याचे सांगितले व नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले
कारखान्याच्या मिल रोलरचे पुजन
आज आयोजीत केलेल्या संचालक मंडळाच्या मिटींगचे औचित्य साधून कारखान्याने मिल रोलरचे पुजन करण्याचा कार्यक्रम माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आयोजीत केला होता. मिल रोलरचे पुजन कारखान्याचे संचालक पांडुरंग श्रीरंग निपुंगे, एकनाथ मारुती जगताप, यांच्या हस्ते रोलरचे विधीवत पुजन करण्यात आले.

याप्रसंगी येत्या हंगामात स्टॉपेजेस होणार नाही आणि जास्तीत जास्त गळीत करण्याच्या दृष्टीने काही अडचण येणार नाही अशा पध्दतीने मशिनरीची ओव्हर ऑईलींगची कामे वेळेत पुर्ण करा अशा सुचना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी ज्ञानेश्वर देवस्थानचे ह भ प देविदास महाराज म्हस्के,जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,दादासाहेब शेळके, कारभारी जावळे,नंदकुमार पाटील,भाऊसाहेब लांडे,भाऊसाहेब निमसे,प्रभाकर कोलते,कैलास जाधव,बाळासाहेब नवले,अरुण सावंत,राजेंद्र सानप,वसंतराव सोनवणे,मदनराव डोळे,
कारभारी डफाळ
बाबुराव चौधरी
बबन दरंदले
संजय जंगले
बाळासाहेब गोरे
बाळासाहेब बनकर
कडूबाळ गायकवाड
सोपान पंडित
रंगनाथ जंगले.रमेश जंगले,आप्पासाहेब निमसे,बाबासाहेब आखाडे,गोरक्षनाथ दरंदले, मुकुंद भोगे ,
संचालक सर्वश्री
बाळासाहेब भणगे, त्रिंबक सुकाळकर,शंकरराव कदम
,बाळासाहेब परदेशी,प्रकाश
भालके ,दिनकर घावटे,लक्ष्मण
पांढरे,दत्तात्रय
बऱ्हाटे , सोपान
विरकर ,
ज्ञानेश्वर दरंदले,
चंद्रकांत टेमक,
कमलताई दहिफळे,
विमलताई सोनवणे
छायाताई भुसारी आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी,सभासद, शेतकरी, कार्यकर्ते
उपस्थित होते.
कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी सुत्रसंचालन केले
आभार कार्यकारी संचालक
शरदराव बेल्हेकर यांनी मानले

फोटोओळी..
मुळा कारखाना सोनईच्या चेअरमनपदी भाऊसाहेब मोटे व व्हा चेअरमनपदी बाळासाहेब पाटील
यांचा सत्कार करतांना मा मंत्री शंकरराव गडाख व उपस्थित संचालक व पदाधिकारी
मुळा सहकारी साखर कारखाना पदाधिकारी
निवडीत मा मंत्री शंकरराव
गडाख यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिकलाही कार्यकर्त्यांना
चेअरमन व व्हा चेअरमनपदाची संधी
देऊन नवा पायंडा पाडला आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







