
नेवासा : अहिल्यानगर जिल्हा स्वस्त धान्य व रॉकेल परवानाधारक असोसिएशनच्या जिल्हा मेळाव्यात संघटनेतील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत मच्छिंद्र पवार पाटील यांची नेवासा तालुका स्वस्त धान्य व रॉकेल दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय अध्यक्षा मीनाताई कळकुंबे यांनी पवार पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

राज्य फेडरेशन व जिल्हा असोसिएशनची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटना बळकट करणे आणि सभासद वाढीसाठी काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे पाटील यांनी दुकानदारांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचे आवाहन केले. या निवडीबद्दल जिल्हासचिव सोमनाथ देवकर, जिल्हाउपाध्यक्ष बावा शेख तसेच बाळासाहेब थोरात, प्रकाश जाधव,पंकज आरसुळे, अंबादास भवार, जगन्नाथ पेहेरे, दत्तात्रय काकडे, महादेव दराडे, अण्णासाहेब दरंदले, भारत गवळी, येडू ढगे, ईश्वर मते, साईनाथ धुमाळ, ज्ञानेश्वर पवार, रमेश लोखंडे, सचिन कडू, शिवाजी काकडे, देविदास मुखेकर, रेवन कांगुणे यांच्यासह तालुक्यातील दुकानदारांनी त्यांचे अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







