
घोडेगाव – सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फरार आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचारी यांना यश आले. गुन्हा र नं १३७/२०२६ बिएन एस चे कलम ३२४(५),३२४(६),सह कलम १११ वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यात पोलीसांना पाहिजे होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीसांना गुंगारा देत अद्याप पर्यंत फरार होते.

वरील गुन्ह्यात हवे असलेले आरोपी घोडेगाव येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक त्या ठिकाणी गेले असता आरोपींनी पोलीसांना पाहताच पळ काढला. परंतु दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी राकेश विशाल आल्हाट वय २३ वर्षे रा जुना चांदा रोड घोडेगाव व मयुर उर्फ बालु रविंद्र तेलधुणे वय २१ वर्षे रा घोडेश्वरी मंदिराजवळ घोडेगाव ता नेवासा हे येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी सोनई पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

सदरची कामगिरी गुन्हे अन्वेषण विभागाचे संतोष मुटकुळे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे,पोलीस हवालदार सोमनाथ झांबरे, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाने, मनोज साखरे, किशोर शिरसाट,पोलीस हवालदार धुळे यांच्या पथकाने केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







