
घोडेगाव – शनी शिंगणापूर येथे पोलीसांनी सध्या कमिशन एजंटवर धडक कारवाई ची मोहीम हाती घेतली आहे. जग प्रसिद्ध असलेले तसेच येथील घरांना दरवाजे नसलेले एक मुलखा वेगळे गाव म्हणून ख्याती असलेले गाव परंतु या कमिशन एजंटमुळे दिवसेंदिवस समाजात वेगळीच व्याख्या जात असल्याने येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ज्यांची सिंघम म्हणून प्रचीती येथील लोकांना झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांनी या लटकुंवर हद्दपारीचा एक प्रकारचा जणू काही विडाच उचलला आहे.

दि. १२ रोजी एका खाजगी पार्कींग समोर सोमनाथ सुरेश साबळे (वय.३०) रा. शनी शिंगणापूर , राजेंद्र खंड फुलसौदर (वय.४८) रा सोनई, राहुल बाळु पेंडेकर (वय.२६) रा. शनी शिंगणापूर, संजय कचरु कुसळकर (वय.५०) रा. सोनई, राजेंद्र मच्छिंद्र विठे (वय.४०) रा. मिरी यांच्या वर सार्वजनिक रस्त्यावर शनी दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे खाजगी चारचाकी वाहनाला रस्त्यावर आडवे होऊन त्यांना पुढे जाण्यास प्रतिबंध करून भाविकांना पुजेचे साहित्य आमचेच दुकानातून घेण्याकरिता प्रवृत्त करीत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस कॉस्टेबल रविकांत गर्जे यांच्या फिर्यादी वरुन वरील आरोपींविरोधात बिएन एस चे कलम १२६(२) २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनी शिंगणापूर पोलीस करत आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवटे यांच्या या कारवाया मुळे भाविकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







