नेवासा – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेवासा फाटा येथील रोझलँड स्कूल मधून आज विठ्ठल नामाची भव्य दिंडी काढण्यात आली. सकाळी 10 वाजता शाळेच्या प्रांगणातून या दिंडीला सुरुवात झाली. संस्थापक *श्री. भाऊसाहेब अंबाडे* यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. नर्सरी ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती.

डोक्याला टोपी, गळ्यात तुळशीमाळ आणि हातात टाळ-मृदुंग घेऊन “जय हरी विठ्ठल” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक भावना वाढीस लागली असल्याचे मत *प्राचार्य श्री थॉमस सर..* यांनी व्यक्त केले.यावेळी अजित अंबाडे, रूपाली मॅडम, कुटे सर,मनिषा सिन्नरकर यांसह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







