आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पालखी

‘अखंड पारायणातून निःस्वार्थ सेवा’ या भावनेतून श्री गजानन विजय पारायण सेवाभावी संस्थेचा उपक्रम

घोडेगाव : श्री गजानन महाराजांचा भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनमानसात पोहोचवत श्री गजानन विजय पारायण सेवाभावी संस्था, घोडेगाव यांच्या वतीने जालना येथे श्रींच्या पालखी सोहळ्यानिमित्त भाविक भक्तांसाठी राजगिरा लाडूंचे प्रसाद वाटप करण्यात आले. रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी हा सेवाभावी उपक्रम भक्तिभावाने व उत्साहात पार पडला.
श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रसाद वाटप करण्याचे संस्थेचे हे चौथे वर्ष आहे.

पालखी

दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या सेवेकरी माऊलींनी मोठ्या भक्तिभावाने या उपक्रमात सहभाग घेत भाविकांना राजगिरा लाडूंचा प्रसाद वितरित केला. या प्रसाद सेवेसाठी जालना व चिखली विभागातील माऊली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘अखंड पारायणातून निःस्वार्थ सेवा’ या भावनेतून संस्थेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमांना भाविक भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संस्थेच्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पालखी


श्रींच्या पालखी सोहळ्यानिमित्त करण्यात आलेल्या प्रसाद वाटपामुळे भाविक भक्तांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. भक्तीबरोबरच सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमातून श्री गजानन महाराजांचा सेवाभावाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचत असल्याचे दिसून आले.
या सेवेत सहभागी झालेल्या सर्व सेवेकरी माऊलींचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

पालखी
पालखी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पालखी
पालखी
पालखी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पालखी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!