नेवासा- दिनांक-११/०८/२०२६ रोजी संध्या. १८.०० वा. चे सुमारास सहा. पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन हददीतील बऱ्हाणपुर गावाचे शिवारात एक इसम नामे संजय पेत्रस भारशंकर रा. बऱ्हाणपुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा त्याचे राहते घराचे आडोशाला लोकांच्या आरोग्यास घातक असलेली नशाकारक विषारी गावठी हातभटटीची दारु विविध रसायने वापरुन तयार करुन तिची विक्री करत आहे.

आता गेल्यास मिळुन येईल अशी माहिती मिळाल्याने सहा. पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांनी सहा. पोउनि माळवे यांना दोन पंचांना बोलावुन घेणेबाबत आदेशीत केल्याने त्यांनी दोन पंचांना पोस्टे येथे बोलावुन घेवुन पंचासह सहा. पोलीस निरीक्षक दिपक धनवटे, सहा. पोउनि माळवे, पोहवा/१३३१ रमेश लबडे, पोकॉ मोरे, पोकॉ शेजुळ, पोकों/काळापहाड, होमगार्ड सह नमुद ठिकाणी जावुन इसम नामे संजय पेत्रस भारशंकर रा. बऱ्हाणपुर ता. नेवासा जि.अहिल्यानगर हा एका लोखंडी बॅरल ठेवुन त्याच्या खाली जाळ घालत असतांना व ड्रममध्ये तयार दारु भरतांना मिळुन आल्याने व सदर ठिकाणी पाहणी केली असता.

१) १००००/- रु किं.ची गावठी हातभटटीची तयार दारु विविध विषारी रसायने वापरुन बनवलेली अंदाजे १०० लि. प्रत्येकी १०० रु लिटर प्रमाणे प्लास्टीकच्या टिपाडामध्ये असलेली.
२) १५०००/- रु किं.चे गावठी हातभटटी दारु तयार करण्यासाठी वापरायचे विषारी कच्चे रसायन अंदाजे ३०० लि.प्रत्येकी ५० रु लि. प्रमाणे निळया रंगाच्या प्लास्टीकच्या टिपाडामध्ये असलेले.
३) २०००/- रु किं.चा पांढऱ्या रंगाचे विषारी नवसागर अंदाजे ०२ किलो वजनाचा प्रत्येकी १००० रु किलो प्रमाणे. असा एकुण २७०००/- रुपये किंमतीचा गावठी हातभटटीची तयार दारु व त्यास लागणारे विविध रसायने या सह मिळुन सहा. पोउनि माळवे यांनी जागीच पंचनामा करुन नष्ट केला आहे.

सदर घटनेबाबत पोहेकॉ १३३१ रमेश महादेव लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनि शिंगणापुर पोस्टे गु.र.नं १३५/२०२६ भा.न्या. संहिता कलम १२३, २२३,२७५ सह म.दा.का. कलम ६५ फ, क, ड, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री एम. सुदर्शन साहेब मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निरज राजगुरु साहेब शेवगाव उपविभाग शेवगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांच्या नेतृत्वात सहा. पोउनि माळवे, पोहवा मोकाटे, पोहवा/१३३१ रमेश लबडे, पोकॉ मोरे, पोकॉ शेजुळ, पोकॉ/काळापहाड, होमगार्ड साळवे, होम. केदार, यांनी केली आहे.
शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन हददीतील नागरीकांना आवाहान करण्यात येते अशा प्रकारचे अवैध धंदे करणारे इसमांबाबत काही माहिती असल्यास शनि शिंगणापुर पोलीस स्टेशन फोन नंबर 02527-238033. यावर तसेच डायल 112 या प्रणालीवर फोन करुन माहिती दयावी.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







