आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मारहाण

घोडेगाव —पत्नीला मुंबई येथे सोबत घेऊन जाण्यासाठी घरी गेलेल्या जावयाला सासरच्या तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकुणे वार केल्याची घटना घोडेगाव येथे घडली. याप्रकरणी संदेश अँथोनी साठे (वय २८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा विवाह सपना रविंद्र लोंढे हिच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला असून त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. पत्नी मागील चार महिन्यांपासून माहेरी घोडेगाव येथे राहत होती. दि. १७ ऑगस्ट रोजी कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी फिर्यादी पत्नीसह अहील्यानगर येथील भरोसा सेलमध्ये गेले होते. त्यानंतर मुंबईला जाण्याचे ठरले.

मारहाण


दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी फिर्यादी घोडेगाव येथे आले. पत्नीने फोन न उचलल्याने ते तिच्या घरी गेले. त्यावेळी जॉन रविंद्र लोंढे, अमन योहाना लोंढे व रविंद्र याकूब लोंढे सर्व राहणार घोडेगाव यांनी त्यांच्याशी वाद घातला. पत्नीला मुंबईला घेऊन जाण्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जॉन लोंढे याने खिशातून चाकु काढून फिर्यादीच्या छातीवर, हातावर व पाठीवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच रविंद्र याकूब लोंढे याने मुलगी पाठवायची नाही, परत येथे आला तर जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

मारहाण


या मारहाणीत फिर्यादीच्या पाठीला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनई येथे पाठविले. पुढील उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, अहील्यानगर येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी जॉन रविंद्र लोंढे, अमन योहाना लोंढे व रविंद्र याकूब लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा र. नं. ३६९/२०२६ बिएन एस चे कलम११५(२), ११८(१), ३५२,३५१(२)३५१(३)३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते करत आहेत.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!