नेवासा – बांग्लादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारा विरोधात आणि तेथील हिंदूंच्या मागे भारतीय हिंदू खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यासाठी व शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन हिंदू हिताचे पाऊल उचलावे, या मागणीसाठी मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी राष्ट्रीय श्रीराम संघाच्यावतीने मानवाधिकार दिनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवाधिकार दिनी संपूर्ण महाराष्ट्रात दि. ८ व १० रोजी दोन टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू एकत्र येऊन शासनाला निवेदन देणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नेवासा तालुक्यातील हिंदूंनी मोठ्या संख्येने येऊन शांततेच्या मार्गाने जाऊन नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील हिंदू बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज महाराष्ट्रच्यावतीने करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.