सलाबतपुर – जि.प.स डॉ.तेजश्री विठ्ठलराव लंघे या ज्ञानमाऊली विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.स डॉ.तेजश्रीताई विठ्ठालराव लंघे पाटील तसेच भाजपा जिल्हा-उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा उपस्थित होते यावेळी डॉ.तेजश्री ताई लंघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन केले की आपण आपल्या मुलांना ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल त्या क्षेत्रात त्यांना काम करून द्या तसेच त्यांच्या कलागुणांना वाव द्या तसेच त्यांना काही मार्गदर्शनाची या वयामध्ये गरज असते त्यांना शिक्षक हे नेहमी मार्गदर्शन करत असतात परंतु शाळे व्यतिरिक्त घरी आपल्या बालकांना आई-वडिलांनीही मार्गदर्शन व अभ्यास घेणे गरजेचे आहे .
जेणेकरून डबल सराव होईल आपले मुले आणखीन अभ्यासामध्ये प्रगती करू शकतील डॉक्टर तेजश्री विठ्ठलराव लंघे या घोडेगाव येथील ज्ञान माऊली विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होत्या.
या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी जि .प .सदस्य कु.डॉ.तेजश्री विठ्ठलराव लंघे , सौ.मंगल ताई काळे, डॉ.कल्पना नाटकर ,घोडेगाव येथील भाजपाचे युवा नेते सचिन देसरडा,प्राचार्य सिस्टर क्विनिटा, सेक्रेटरी सिस्टर नीलमणी, सिस्टर रफिला ,सिस्टर अनुषा व घोडेगांव येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व परिचय नवनाथ शिंदे सर यांनी करून दिला .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्रिन्सिपल सिस्टर क्विनीटा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.