सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा साजरी करण्यात आली. या निमित्ताने भानसहिवरा येथील मंडळ अधिकारी मा. सरिता मुंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थीनींनी मोबाईल चा वापर कमी करून शिक्षणाकडे लक्ष द्यावे, आपल्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवून शिक्षण घेतले पाहिजे , सकारात्मक विचार केला तर सकारात्मक कृती होईल आणि तरच यश प्राप्त होईल, असे मत मांडले.
कायद्याने स्त्री -पुरुष समानता असली तरी प्रत्यक्ष व्यव हारात असली पाहिजे तरच प्रगल्भ समाज म्हणता येईल. पुरुषाप्रमाणे स्त्रियांदेखील समर्थपणे कोणत्याही क्षेत्रात कार्य करु शकतात. त्यामुळे केवळ लिंगभावाच्या आधारावर स्त्री -पुरुष्यात भेदभाव निर्माण केला जाऊ नये. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचे अनुकरण मुलींनी केले पाहिजे.तसेच स्त्रियांच्या अधिकारासाठी आणि सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती उदाहरणासह दिली.याशिवाय मुंडे मॅडम यांनी महसूल खात्यातील विविध योजनांची माहिती दिली.
त्याचबरोबर ब्राम्हणी येथील कु. वैष्णवी ढोकणे हिने विद्यार्थिनींना कराटे प्रात्यक्षिकाह आत्मसंरक्षणाचे धडे दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने हे होते त्यांनी, विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर बनायचे असेल प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले.
कार्यक्रमासाठी आणि ९२ विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल निपुंगे यांनी प्रास्ताविक केले, कु. गायत्री ढोकणे हिने सूत्रसंचालन केले, डॉ संभाजी दराडे, यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रा. प्रियांका सोनवणे आणि प्रा. विशाल पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कष्ट घेतले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.