सोनई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यातील व जोडधंदेतील कामगाराच्या वेतन वाढीसह इतर मागण्याबाबत विचार करण्यासाठी साखर कारखाना मालक प्रतिनिधी व साखर कामगार प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समिती त मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस डी एम निमसे यांची निवड झाल्याबद्दल मुळा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर साहेब यांचे हस्ते कारखान्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. साखर कामगाराच्या प्रश्नावर साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व साखर कामगार महासंघ या राज्यव्यापी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालनामध्ये त्रिपक्षीय समिती बाबत सविस्तर चर्चा झाली.
समितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस आनंदराव वायकर, प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, महासंघाचे कार्याध्यक्ष शिवाजी औटी, साखर कामगार फेडरेशनचे अविनाश आदिक यांची निवड झाली आहे. मुळा कारखाना कार्यस्थळावर आज झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले ,सेक्रेटरी रितेश टेमक ,वसंतराव भोर ,लक्ष्मण बारगळ , कार्यालयीन अधीक्षक योगेश घावटे ,युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार साहेब उपाध्यक्ष कारभारी लोडे, खजिनदार सुभाष सोनवणे ,सह सेक्रेटरी भारत पटारे ,
कामगार संचालक किशोर राजगुरू, विश्वास डेरे,परचेस ऑफिसर सोमेश देशमुख , शेतकी अधिकारी विजय फाटके ,
उपशेतकी अधिकारी चावरे , डिस्टलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले ,बी एस बानकर रफिक पटेल , आदिनाथ शेटे,इलेक्ट्रिक इंजिनिअर पुगळे ,भासार, गोवर्धन बेल्हेकर, संदीप इथापे, राजेंद्र शिंदे, विजय गोरे,गणगे साहेब, शांतीलाल सुपारे ,पोपट कंक ,सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.