नेवासा – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतही दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीतील महायुतीला दमदारं यश मिळाले. या निवडणुकीत भाजपने आतापर्यंतच्या सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या यांचिकांवरील सुनावणी जानेवारीत होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी ४ जानेवारी रोजीच होण्याची शक्यता असून, तीन महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे सकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.