नेवासा – तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील सरपंचास पोस्टामार्फत निनावी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याबाबत सरपंच कृष्णा शिंदे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे पत्र गावातीलच टपाल कार्यालयात टाकले गेले असल्यामुळे पत्र टाकणारी व्यक्ती गावातीलच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरपंच शिंदे यांनी सांगितले की, तातडीने या पत्राची दखल घेऊन, माझ्या जीवितास काही धोका होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची भेट घेऊन केली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.