नेवासा – शहरातील खोलेश्वर गणपती चौक येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती येथे चौक येथे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मनोज पारखे व अजित नरुला यांच्या पुढाकाराने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सुशासन दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महायुतीचे मार्गदर्शक व पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर जी शिंदे काका व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी ही उपस्थित राहून अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी भाजपा शिवसेना महायुतीचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सचिव निरंजन डाळे, शहर अध्यक्ष रोहित पवार, आदिनाथ पटारे, विलास बोरुडे, राजेश कडू, विकी सोनवणे, मंगेश गोसावी, महेश आरले, शिवा लष्करे, रामदास लष्करे, करण पोटफोडे, डॉक्टर लक्ष्मण खंडाळे, भास्करराव कनगरे, शंकर कंगरे, संतोष कुटे, बाळासाहेब दारुंटे, किरण दारुंटे, नितीन मीरपगार, अनंता डहाळे, पप्पू देशमुख, रामभाऊ केंदळे आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.