ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ramgiri Maharaj

Ramgiri Maharaj on Bangladesh Crisis : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

Ramgiri Maharaj on Bangladesh Crisis : सनातन एकत्र आले आणि 23 तारखेला निकाल पाहिला. सगळे जागे झाले तर जगात उलथापालथ करतील. अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू, असे वक्तव्य सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केले. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

रामगिरी महाराज म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आपण एकत्र आलोय. 1971 मध्ये सुद्धा अत्याचार झाले, 35 लाख महिलांवर पाकिस्तानी लोकांनी बलात्कार केले. त्यावेळी हा देश आपण स्वतंत्र केला आणि आज तिथेच हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. ज्या इस्कॉन मंदिरांनी कोरोनात या लोकांना जेवायला घातले तेच लोक आता उलटले आहेत. एक एक महिलेवर 20-30 लोकांनी बलात्कार केला. सनातन कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही. पण, आम्हाला शिकवले कुणी एक गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा, मात्र, शास्त्र हे सांगत नाही. समोर कुणीही असू द्या. अन्याया विरोधात लढायचं आपलं काम आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Ramgiri Maharaj

भगवद्‌गीतेतही हे सांगितलं आहे की, सनातन संस्कृती एक गालात मारल्यावर पुढचा गाल पुढं करत नाही. हिंसा कुणी करत असेल तर ती सहन का करावी? आपण आजपर्यंत अन्याय सहन करत आलोय हे दुर्दैव आहे. मी नाशिकमध्ये काही बोललो ते अत्याचाराबाबत बोलत होतो. त्यावेळी काही लोक पुढं आले, एकीकडे म्हणतात संविधानावर विश्वास आहे आणि रस्त्यावर उतरतात, सोयीने संविधानाचे नाव घेतात. जगात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म. बाकी सगळे फक्त पंथ आहेत. अन्याय करणारे अधर्मी आहेत, असा धर्म असूच शकत नाही, असा हल्लाबोल रामगिरी महाराजांनी (Ramgiri Maharaj) यावेळी केला. 

बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याचा निषेध

आम्ही कुणाच्या विरोधात नाही. सनातन एकत्र आले आणि 23 तारखेला निकाल पाहिला. सगळे जागे झाले तर विश्व उलथापालथ करतील. अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू, असेही त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याचा निषेध. आपण सावध राहावे, आपण वेगळे झालो तर आपल्या देशात ही हे होऊ शकते. पालघरला दोन मारण्यात आले. मारणाऱ्यांना शिक्षा झाली का? आता सरकारने सावध असायला हवे, तुम्हाला निवडून दिले आहे. आम्हाला बोलण्याचा हक्क आहे, अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात त्यांना भारतात आश्रय द्यायला हवा, असेही रामगिरी महाराजांनी म्हटले आहे. 

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ramgiri Maharaj
Ramgiri Maharaj

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ramgiri Maharaj


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!