आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये सोमवार दिनांक २२ डिसेंबर रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा बुद्रुकचे सरपंच प्रकाश सोनटक्के होते तर यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तनपुरे,नेवासा येथील आदर्श विद्यामंदिर चे मुख्याध्यापक राजेंद्र शेंडे, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ कर्जुले, नेवासा बुद्रुक चे माजी उपसरपंच शिवाजी गपाट, प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.


विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ११२ स्टॉल मांडून इडली- सांबर, वडापाव, पॉपकॉर्न, पॅटीस, पाणीपुरी, चहा कॉफी यांसारख्या विविध पदार्थांची विक्री करून बाल आनंद मेळाव्याचा आनंद लुटला आणि चाळीस हजार रुपयांची खरेदी- विक्री केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश सोनटक्के यांनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या विद्यार्थ्यांना आबान मोसिन बागवान यास प्रथम क्रमांक ५००रुपये, ओंकार दत्ता गायकवाड द्वितीय क्रमांक ३०० रुपये तसेच प्रणव खरात व ओमकार हेलवडे यास तृतीय क्रमांक २०० रुपयांची वैयक्तिक पारितोषिके देऊन कौतुक केले.
आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जनार्दन बनकर, भाऊसाहेब चाबुकस्वार, अनिल भणगे, अनिता लोखंडे, लता थिगळे, वनिता आघवणे, मनिषा धिंदळे यांनी परिश्रम घेतले. संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन केले तर जनार्धन बनकर यांनी आभार व्यक्त केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानोदय
ज्ञानोदय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानोदय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!