आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+


नेवासा : शहरातील जिल्हा परिषद नेवासा मुली शाळेतील
विद्यार्थिनींचा शनिवारी बाल आनंद मेळावा‎ घेण्यात आला.यामध्ये तब्बल ६५ विद्यार्थिनींनी सहभाग घेत विविध पदार्थांचे स्टॉल लावले.
आनंद मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पाणीपुरी,‎ भेळ,समोसा, वडापाव, इडली,‎ मसाला पापड, भजे,पॅटिस यासह खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच पालेभाज्या व फळांचे स्टॉल लावले होते.
या आनंद बाजाराचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा वर्षा पठाडे,उपाध्यक्षा अनिता डोकडे,मुख्याध्यापक अरविंद घोडके व महिला पालकांच्या यांच्या हस्ते झाले.


विद्यार्थीनींना ‘कमवा‎ व शिका’ याची जाणीव होण्यासह‎ विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी,विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने आनंद मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन मुख्याधापक अरविंद घोडके यांनी केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य सचिन गव्हाणे,रंजन जाधव,गौरव चव्हाण,महेश शेजुळ,डॉ.बाळासाहेब दाणे,नितीन पंडित यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
शिक्षका वैशाली कुलट,ज्योती बोरूडे,वर्षा जगताप,प्रतिभा पालकर,सुनीता वणे,विठ्ठल कांगुणे,शरद मचे,यांनी परिश्रम घेतले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाजार
बाजार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!