नेवासा :शिवारातील नेवासा बुद्रुक प्रवरानदीच्या तीरावर असलेल्या श्रीराम अगस्ती ऋषि आश्रमाच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित त्रिदिनात्मक ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सवास गुरुवारी दि.२६ फेब्रुवारी रोजी आश्रमाचे महंत ज्ञानगिरी महाराज व महंत गंगागिरी महाराज यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करून प्रारंभकरण्यात आला.
यावेळी श्रीराम अगस्ती ऋषि आश्रम प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अगस्ती आश्रमाचे महंत ज्ञानगिरी महाराज, महंत गंगागिरी महाराज, पारायण व्यासपीठ चालक हभप भानुदास महाराज भिसे, योगेश महाराज होन इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी किशोर गारुळे, गोकुळ जायगुडे, पुंजाराम महाराज पेचे, भिकाजी सोमासे यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात ध्वज पूजन करण्यात आले.
यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पेचे, नानासाहेब डौले, भीमराज माने, संभाजी रेडे, पुंजाराम महाराज पेचे, अगस्ती तरुण मंडळाचे सर्व सेवेकरी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या त्रिदिनात्मक सोहळयामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ७विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ७ते ११ ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पारायण, ११ते १ महाप्रसाद, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ७ ते ९ यावेळेत हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
अगस्ती ऋषि मंदिराच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा व किर्तन श्रवणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अगस्ती ऋषि आश्रम भक्त परिवार व अगस्ती ऋषी तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







