आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रोजगार

नेवासा : एकल महिलांना विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी पंचायत समिती सभागृहात रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. संजय बिरादार हे होते याप्रसंगी नेवासा तालुक्यातील बचत गटाच्या २५० हून अधिक एकल महिला रोजगार मार्गदर्शन शिबिरात सहभागी झाल्या होत्या.

उमेद अभियान, महिला व बाल विकास प्रकल्प व साऊ एकल महिला नेवासा तालुका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ रोजी रोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिरास गटविकास अधिकारी संजय लखवाल नायब तहसीलदार संदीप चिंतामणी, नगराध्यक्ष डॉ. करणशिंह घुले, साऊ एकल महिला समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे, नेवासा तालुका समन्वयक कारभारी गरड, अप्पासाहेब वाबळे, रेणुका चौधरी, सेंट्रल बैंक समन्वयक रविंद्र काळे जिल्हा संसाधन कृषी अधिकारी सीमा काळकुंड, बाल विकास प्रकल्पाधिकरी भावना पवार, रेणुका कुन्हे, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक अर्जुन सोनवणे, ऐश्वर्या देशमुख , विलास राठोड आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

रोजगार

याप्रसंगी गट विकास अधिकारी संजय लखवाल तहसीलदार संजय बिरादार , रविंद्र काळे, सिमा काळपुंड, मिलिंद साळवे, कारभारी गरड, अर्जुन सोनवणे आदींनी आपल्या पल्या मनोगतातून एकल महिला बचत गटासाठी व वैयक्तिक शासनाच्या विविध योजना, करावयाचे उद्योग व्यवसाय त्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावयाचा प्रस्ताव, कर्ज मर्यादा, अनुदान बँकेची मंजुरी परतफेड, तयार केलेले साहित्य वस्तू यांची विक्री व्यवस्थापन याबाबत सविस्तर विवेचन केले. सूत्रसंचालक बाळासाहेब पिसाळ यांनी केले, शिबिर यशस्वीतेसाठी सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब कासार, जयश्री जाधव, नितीन पंडित, तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, बचत गटाच्या सीआरपी व अंगणवाडी ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.

रोजगार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रोजगार
रोजगार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रोजगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!