नेवासा – नेवासा येथे आज खासदार वाकचौरे साहेब यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे जाऊन पवित्र पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंदिराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
मंदिर परिसरातील सोयी-सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच भविष्यातील विकास आराखडा याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला. लवकरच संसदेत मंदिर विकासाचा विषय उपस्थित करून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक निर्णय घेत विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही खासदारांनी यावेळी दिली. तसेच या विषयावर संसदेत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंदिरचे महंत वेदांतचार्य गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के, समितीचे ज्येष्ठ विश्वस्त भिकाजी जंगले, मंदिराचे संपर्क अधिकारी आशिष कावरे, रवी जमधडे, विष्णू जाधव, अशोक ताके, दिपक शिंदे, नितीन जगताप, खासदार साहेबांचे स्वीय सहायक सोनवणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

खासदारांच्या या भेटीमुळे मंदिर विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा भाविक व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







